पुणे –दिवसभरात 259 करोना बाधितांची नोंद झाली असून, 256 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. याशिवाय गेल्या 24 तासांत 12 जणांचा मृत्यू झाला असून, त्यातील सात जण पुण्याबाहेरील आहेत.
गेल्या सुमारे 17 महिन्यांच्या कालावधीत 29 लाख 67 हजार 796 संशयितांच्या स्वॅब टेस्ट झाल्या. त्यातील 4 लाख 89 हजार 506 जणांना करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यातील 4 लाख 78 हजार 629 जण बरेही झाले. मात्र 8 हजार 828 बाधितांचा मृत्यू झाला.
सद्यस्थितीत 2 हजार 49 बाधित सक्रीय असून, त्यातील 204 जणांची प्रकृती गंभीर असून, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. तसेच 328 जणांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे.
दिवसभरात 9 हजार 900 जणांची स्वॅबटेस्ट झाली असून, संशयितांची संख्याही वाढल्याचे टेस्टवरून दिसून येते.