पुणे –शहरात दिवसभरात 220 नव्या करोना बाधितांची नोंद झाली असून, 7 हजार 640 संशयितांची स्वॅब टेस्टही घेण्यात आली आहे. आजपर्यंत 29 लाख 43 हजार 963 संशयितांची स्वॅब टेस्ट करण्यात आल्या आहेत.
त्यातील 4 लाख 88 हजार 902 जण बाधित आढळले आहेत. त्यातील 4 लाख 77 हजार 883 बाधित बरे झाले आहेत, त्यामध्ये गेल्या 24 तासांत डिस्चार्ज झालेल्या 304 जणांचा समावेश आहे. सद्यस्थितीत 2 हजार 206 सक्रीय बाधित असून, त्यातील 202 बाधितांची प्रकृती गंभीर असून 354 बाधितांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे.