पुणे – शहरात करोनाने एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही; तर शहर हद्दीबाहेर दोन बाधित मृत पावले आहेत. त्यांच्यावर पुण्यात उपचार सुरू होते. याशिवाय 71 नव्या बाधितांची नोंद शहरात झाली आहे.
गेल्या 24 तासांत 79 जणांना डिस्चार्ज दिला असून, 5 हजार 239 संशयितांची स्वॅब टेस्ट करण्यात आली आहे. सद्यस्थितीत बाधित असलेल्यांमध्ये 731 सक्रीय बाधित असून, त्यातील 112 जणांची प्रकृती गंभीर आहे; तर 104 जणांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. आजपर्यंतच्या झालेल्या स्वॅब टेस्टमध्ये 5 लाख 4 हजार 286 नवे बाधित सापडले असून, 4 लाख 94 हजार 481 जण बरे झाले आहेत. तर शहरातील 9 हजार 74 बाधितांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पुण्यात करोनाने एकही मृत्यू झालेला नाही. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर दिलासा मिळत आहे.