पुणे – शहरात बुधवारीही करोनाने एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही; तर शहर हद्दीबाहेर दोन बाधित मृत पावले आहेत. त्यांच्यावर पुण्यात उपचार सुरू होते. याशिवाय 96 नव्या बाधितांची नोंद शहरात झाली आहे.
गेल्या 24 तासांत 104 जणांना डिस्चार्ज दिला असून, 5 हजार 490 संशयितांची स्वॅब टेस्ट करण्यात आली आहे. सद्यस्थितीत बाधित असलेल्यांमध्ये 832 सक्रिय बाधित असून, त्यातील 139 जणांची प्रकृती गंभीर आहे; तर 115 जणांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. आजपर्यंतच्या झालेल्या स्वॅब टेस्टमध्ये 5 लाख 4 हजार 16 नवे बाधित सापडले आहेत.