पुणे- पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे परिस्थिती गंभीर होताना दिसत आहे. पुण्यात कोव्हिड सेंटरमध्ये रुग्णांला बेड मिळत नसल्याची माहिती समोर आली आहे. सकाळ पासून कोरोना रुग्णाची बेडसाठी धडपड सुरु आहे. मात्र उपचारासाठी त्यांना अद्याप बेड मिळाला नाही आहे.
पुण्यात जम्बो कोव्हिड सेंटर मोठा गाजावाजा करत उभारण्यात आलं होतं. मात्र काही दिवसांपुर्वी ते सेंटर वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या कोव्हिड सेंटर बाहेर एक रुग्ण रुग्णवाहिकेतच 2 तास तरफडत होता मात्र त्यांना बेड मिळाला नाही आहे. ही परिस्थिती प्रचंड विदारक होताना दिसते आहे.
कोव्हिड पॉझिटिव्ह असणाऱ्या वडिलांना घेऊन एक मुलगा रुग्णालयाच्या दारोदार फिरत आहे. आज सकाळपासून तो पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यासाठी प्रयत्न करत आहे. पण कुठेही बेड मिळत नाही. त्यामुळे आपल्या बापाच्या जिवासाठी मुलाची तळमळ सुरु आहे.
पुण्यातील कोरोना स्थितीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची मॅरेथॉन बैठक पार पडली. यात अनेक निर्णय घेतले गेले. मात्र तरीही पुण्यातील परिस्थिती जैसे थे असल्याचे पाहायला मिळत आहे.