पुणे – पुणे शहरात आज नव्याने 137 कोरोनाबाधितांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता 1 लाख 64 हजार 879 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 4 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
दिवसभरात आज 221 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुणे शहरात उपचार घेणाऱ्या 4 हजार 129 रूग्णांपैकी 377 रूग्ण गंभीर असून यातील 245 रूग्ण व्हेंटिलेटरवर तर 132 रूग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.
दिवसभरात एकूण 1032 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. पुणे शहरात आतापर्यंत एकूण 7 लाख 69 हजार 979 टेस्ट करण्यात आल्या आहेत. पुण्यातील कोरोनाबाधित रूग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 95 टक्क्यांजवळ पोहोचले आहे.