पुणे –रेल्वेच्या पुणे विभागाकडून पाटस ते दौंड या स्थानकांदरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवारी (10 फेब्रुवारी) धावणाऱ्या रेल्वेच्या वेळापत्रकात अंशत: बदल होणार आहे.
पुणे ते दौंड सेक्शनमधील पाटस ते दौंड स्थानकांदरम्यान भुयारी मार्गाच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर रेल्वेच्या वेळापत्रकात बदल होणार आहे. 10 फेब्रुवारी रोजी दौंड ते इंदौर मार्गावरील रेल्वे दुपारी 2 वाजण्याऐवजी 4.40 वाजता सुटणार आहे. तर ब्लॉकच्या वेळात जम्मूतवी- पुणे झेलम एक्स्प्रेस, बेंगळुरू – मुंबई उद्यान एक्स्प्रेस, नागरकोइल – मुंबई एक्स्प्रेस, हजरत निजामुद्दीन -वास्को गोवा एक्स्प्रेस पुणे विभागात उशिराने धावणार आहेत, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले.