पुणे – महानगरपालिकेच्या वतीने दि. 11 डिसेंबरला पादचारी दिन साजरा केला जाणार आहे. यानिमित्त लक्ष्मी रस्त्यावर ‘वाॅकिंग प्लाझा’ करण्यात येणार आहे. या मार्गावर सकाळी 10 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत पीएमपी बस बंद असतील. तसेच शहराच्या मध्यवर्ती भागांत सुरू असलेली अटल, पुण्यदमशम ७ आणि ९ हे मार्ग बंद राहणार आहेत. लक्ष्मी रस्त्यावर उंबऱ्या गणपती चौक ते गरूड गणपती चौक असा हा वॉकिंग प्लाझा असेल. त्यामुळे या मार्गावरील पीएमपी बस अन्य मार्गांनी धावतील.
– बस मार्ग क्र. ५५, ५८, ५९ शनिपारकडे येताना कुमठेकर रोड मार्गे नियमित मार्गाने व शनिपारकडून जाताना अ.ब.चौक, नारायण पेठ, अलका टॉकीज चौकातून पुढे जातील.
– बस मार्ग क्र. ५७ पुणे स्टेशनकडून जाताना बस मार्ग क्र. ९४ ने नारायणपेठ मार्गे अलका टॉकीज चौक व
पुढे नियमित
– बसमार्ग क्र. ८१, १४४, १४४ अ, १४४ क व २८३ या मार्गावरील बसेस पुणे स्टेशनकडे जाताना नियमित मार्गाने व पुणे स्टेशनकडून येताना मनपा मार्गे धावतील.
– बसमार्ग क्र. १७४ पुणे स्टेशनकडून एनडीएकडे जाताना सिटी पोस्टपर्यंत नियमित व पुढे स्वारगेट, सारसबाग, टिळकरोड, डेक्कन कॉर्नर व पुढे नियमित मार्गाने. एनडीएकडून पुणे स्टेशनकडे येताना सदर मार्गावरील बसेस नियमित मार्गाने जातील.
– बस मार्ग क्र. १९७ व २०२ या मार्गावरील बसेस हडपसरकडून कोथरूड डेपो /वारजे माळवाडीकडे जाताना सिटी पोस्टपर्यंत नियमित. पुढे स्वारगेट, सारसबाग, टिळकरोड, डेक्कन कॉर्नर व पुढे नियमित मार्गाने. कोथरूड डेपो, वारजे माळवाडीकहून हडपसरकडे जाताना बसेस नियमित मार्गाने संचलनात राहतील.
– बसमार्ग क्र. ६८ या मार्गावरील बसेस अप्पर डेपोकडे जाताना नियमित मार्गाने व अप्पर डेपो कडून सुतारदराकडे येताना टिळकरोड मार्गे संचलनात राहतील.