पुणे : शहरासह जिल्ह्यातील किमान तापमानात वाढ झाल्याने शहराच्या मध्यवर्ती भागात थंडीचा कडाका काहीसा कमी झाला आहे. मात्र, उपनगरासह जिल्ह्यात हुडहुडी भरणारी थंडी जाणवत आहे.
दरम्यान, पुढील दोन दिवसात पुण्यातील किमान तापमानात दोन ते तीन अंशाने घट होणार असल्याने थंडीचा कडाका पुन्हा वाढण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.
रविवारी (दि. 28) शहरातील किमान तापमान 13 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. मात्र, रात्रीनंतर एनडीए, पाषाण आणि हवेलीच्या काही भागात थंडीचा जोर वाढला होता.
दि. 30 तारखेनंतर किमान व कमाल तापमानात तीन अंशाने घट होण्याची शक्यता असल्याने पुण्यासह राज्यातील हुडहुडी पुन्हा वाढेल, असा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे.