विनयभंगप्रकरणीही खडक पोलिसांत गुन्हा दाखल
पुणे – आईवर करणी झाल्याचे सांगून एका भोंदू बाबाने अघोरी प्रकार करीत तर दुसऱ्याने अश्लील चाळे करून तब्बल 50 लाख 30 हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला. याप्रकरणी एका भोंदू बाबासह दोघांना खडक पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
राजेंद्र बलराम कन्ना (45, रा. गंजपेठ) आणि मनीष बापूराव शिंदे (42, रा. देहूरोड, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबात एका 35 वर्षीय महिलेने खडक पोलिसांत फिर्याद दिली आहे.
मे 2018 ते 2019 या कालावधीत राजेंद्र कन्ना याने फिर्यादीला त्यांच्या आईवर नातेवाईकांनी करणी केले असल्याचे सांगितले. करणी काढण्यासाठी त्याने जादुटोणा करण्यासाठी कागदी चिठ्ठ्या तयार केल्या.
काळी बाहुली, लिंबू, हळद, कुंकु, लिक्वीड याचा वापर करून होमहवन केले. तसेच बोकडाचा स्मशानभूमीत बळी देण्यासाठी अघोरी कृत्य केले. त्यांच्याकडून वेळावेळी रोख रक्कम 50 लाख 30 हजार घेऊन त्यांची फसवणुक करून आरोपी मनीष शिंदे याने कन्ना याच्याकडून पैसे काढून देतो असे फिर्यादीसोबत वेळोवेळी अश्लील चाळे करून विनयभंग केला.