पुणे -राज्य शासनाने सहायक पोलीस आयुक्तांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये पुणे शहरातील काही सहायक पोलीस आयुक्तांचा समावेश आहे. यामध्ये संभाजीनगरचे दहशतवाद विरोधी पथकाचे उपअधीक्षक सुनील तांबे यांची पुण्यात बदली झाली आहे. तर पुण्यातील सहायक पोलीस आयुक्त विजय चौधरी यांची पुण्यातच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षकपदी बदली झाली आहे.
पुणे सहायक आयुक्त (बदलीचे ठिकाण) – पुण्यातील सहायक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे (उपविभागीय पोलीस अधिकारी, सातारा ग्रामीण), पुणे शहर सहायक पोलीस आयुक्त पोर्णिमा तावरे (उप अधीक्षक, महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी, पुणे), उपअधीक्षक महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी अश्विनी राख (सहायक पोलीस आयुक्त पुणे), सहायक पोलीस आयुक्त चौधरी (अप्पर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव (उपअधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण).
बाहेरच्या जिल्ह्यातून पुण्यात आलेले अधिकारी (बदलीचे ठिकाण) – अमरावती अप्पर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अरुण सावंत (पोलीस उपअधीक्षक, कारागृह, पुणे), खंडाळा उपअधीक्षक पोलीस प्रशिक्षण केंद्र अप्पासाहेब शेवळे (सहायक पोलीस आयुक्त, पुणे), ठाणे शहर सहायक पोलीस आयुक्त जगदीश सातव (सहायक पोलीस आयुक्त, पुणे), पुणे अपर पोलीस अधीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग नंदा पाराजे (सहायक पोलीस आयुक्त पुणे), संभाजीनगर उपअधीक्षक दहशतवाद विरोधी पथक तांबे (सहायक पोलीस आयुक्त, पुणे).