गृहनिर्माण प्रकल्पांबाबतची फसवणूक टळणार
पुणे – घराचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांची फसवणूक होऊ नये यासाठी महारेरा, सर्व महापालिका आणि नगरपालिका यांची गृहनिर्माण प्रकल्पांबाबतची माहिती डिजिटल पद्धतीने लिंक करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. दरम्यान, महारेरा आणि मुंबई महापालिका सध्या डिजिटली एकमेकांशी जोडले गेले आहेत. पुणे, ठाणे महापालिका आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण येथेही अशा प्रकारे डिजिटली जोडले जात असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.
विधिमंडळात यासंदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ही माहिती दिली. काही जणांकडून चुकीची अथवा खोटी कागदपत्रे दाखल करुन तसेच गृहनिर्माण क्षेत्राशी संबंधित शासकीय यंत्रणांची कागदपत्रे चुकीच्या पद्धतीने तयार करून नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार समोर येत आहेत. (पान 2 पाहा)8
अनधिकृत बांधकामाला आळा घालण्यासाठी ज्या महापालिकांची आर्थिक स्थिती चांगली आहे, अशा महापालिकांनी सॅटेलाइटद्वारे छायाचित्रे मिळविण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल.
– देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री