पुणे- दुचाकीवरून जात असताना चंदननगर येथील नागपाल रोड सोसायटी समोर भरधाव वेगात असलेल्या वाहनाने दिलेल्या धडकेत एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. उत्तम सुदाम यंकुळे (65, रा. चौधरी वस्ती, खराडी) यांचा अपघाती मृत्यू झाला.
अज्ञात वाहनाने त्यांना धडक देऊन वाहन चालक तेथून पसार झाला. याबाबत त्यांचा मुलगा संदिप यंकुळे यांनी चंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दि. 16 नोव्हेंबर रोजी दुपारी ही घटना घडली.