Pune Crime: कोयत्याचा धाक दाखवून लूटमार करणारी टोळी ‘गजाआड’; 5 गुन्हे उघडकीस

पुणे: कोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत तलवारी, कोयता व धारदार हत्यारांचा धाक दाखवून लूटमार करणार्‍या तिघांना गुन्हे शाखे युनिट 5 ने अटक केली. त्यांच्याकडून एक दुचाकी व पाच महागडे मोबाईल जप्त करण्यात आले आहे. त्यांच्याकडील तपासात हडपसर, लोणी काळभोर आणि कोंढवा पोलिस ठाण्यातील एकूण पाच चोरी आणि जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

प्रफुल भारत कांबळे (21, रा. ससाणेनगर, हडपसर), परवेज हैदरअली इनामदार (20, रा. आदर्यनगर, तिरंगा चौक, काळेपडळ, हडपसर) आणि विजय बाळु सोनवणे (22, रा. जेएसपीएम कॉलेज पाठीमागे, हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्याचे नावे आहेत.

इनामदार, सोनवणे, तसेच एक अल्पयीन मुलगा यांनी दुचाकीचा वापर करून् कात्रज बायपास रोडवर रात्रीच्या वेळी दुचाकीवरून जाणार्‍यांना कोयत्याचा धाक दाखवुन त्यांच्या खिशातील मोबाईल व रोख रक्कम चोरून नेल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.