पुणे – नवले पुलाजवळील स्वामी नारायण मंदिराजवळ ट्रकला भीषण अपघात झाला आहे. अपघाताची धडक एवढी मोठी होती की ट्रकने पेट घेतला आणि त्याचे रूपांतर राखेत झाले.
आग आटोक्यात आणण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या चार आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग आटोक्यात आणण्यासाठी जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.
मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.