पुणे :- खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीमधील होत असलेली वाढ व पाणलोट क्षेत्रामधील अतिपर्जन्यमानामुळे आज (दि.२९) ठीक रात्री ११.०० वा. खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये ८५६ क्युसेक ने विसर्ग सुरू करण्यात येत आहे. अशी माहिती उपविभागीय अभियंता(मुठा कालवे पाटबंधारे उपविभाग, स्वारगेट, पुणे) यांनी दिली आहे.
तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे याची नोंद घेण्यात यावी. त्यामुळे कोणीही नदीपात्रात उतरू नये. आणि नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत.
कृपया सखल भागातील संबंधीत नागरीकांना सूचना देण्यात याव्या आणि उचित कार्यवाही करण्यात यावी.सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी. असे आवाहन देखील प्रशासनाकङून करण्यात आले आहे.