पुणे – दिवसभरात करोना बाधितांची संख्या 259 नोंदवण्यात आली असून गेल्या 24 तासांत मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या सहा असून त्यातील तीन रुग्ण पुण्याबाहेरील आहेत.
बाधितांची संख्या 1 लाख 82 हजार 448 असून त्यातील ऍक्टिव्ह रुग्णसंख्या 2601 आहे. तसेच, गंभीर रुग्णसंख्या 208 आहे.
दिवसभरात 380 रुग्णांना डिस्चार्ज दिला असून एकूण बाधितांमधील 1 लाख 75 हजार 154 जण बरे होऊन घरी गेले आहेत.
करोनाने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 4693 असून दिवसभरात शहरात सहा मृत्यू झाले आहेत.