पुणे – तंत्रनिकेतन, पदविका संस्थांना 40 दिवसांची सुट्टी

तंत्रशिक्षण कार्यालयाची माहिती

पुणे – सर्व शासकीय व अशासकीय अनुदानित व विनाअनुदानित तत्वावर चालणारी तंत्रनिकेतने व अन्य पदविका संस्थांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दि. 17 मे ते 25 जून, असे 40 दिवस उन्हाळी सुटी देण्यात येणार असल्याचे तंत्रशिक्षण कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

तंत्रशिक्षण संचालनालय अंतर्गत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्रत्येक वर्षी 20 दिवस हिवाळी सुटी व 40 दिवस उन्हाळी सुटी देण्यात येते. त्यानुसार संस्थाप्रमुखांनी नियोजन करावे, असेही तंत्रशिक्षणचे कळविले आहे. दरम्यान, परीक्षा व उत्तरपत्रिका मूल्यमापनाच्या कामासाठी ज्या कर्मचाऱ्यांना थांबविण्यात येईल, ते परीक्षेची कामे सुरळीत पार पाडतील. त्यात कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित कर्मचाऱ्यांकडून परीक्षेच्या कामामध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई किंवा कामचुकारपणा दिसून आल्यास त्यांच्यावर नियमाप्रमाणे शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचे तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ यांनी परिपत्रकात नमूद केले आहे. ज्या संस्थांना शैक्षणिक स्वायत्तता दिलेली आहे, त्या संस्थांना त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या कालावधीचा विचार करून आणि राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या परीक्षेच्या कामासाठी लागणारा कर्मचारी वर्ग उपलब्ध करून दिला जाईल, या अटीवर सुटी देण्यास परवनागी देण्यात येत असल्याचे तंत्रशिक्षणने म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.