#व्हिडीओ : अल-बगदादी जिवंत; श्रीलंकेतील साखळी स्फोटांची स्वीकारली जबाबदारी 

नवी दिल्ली – इस्लामिक संघटनेचा कुख्यात दहशतवादी अबू बकर अल-बगदादी अद्यापही जिवंत असल्याचे समोर आले आहे. पाच वर्षातून पहिल्यांदाच सोमवारी एक व्हिडीओ जारी करून अल-बगदादी जिवंत असल्याचा दावा करण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे अल-बगदादीने ईस्टर संडे दिनी श्रीलंकेतील साखळी स्फोटांची जबाबदारीही स्वीकारली आहे.

या व्हिडिओमध्ये अल-बगदादी श्रीलंकेतील स्फोटांविषयी चर्चा करताना दिसत असून हल्लेखोरांचे कौतुक करताना दिसत आहे. यामधील त्याच्या सहकाऱ्यांचे चेहरे अस्पष्ट दिसत आहेत. हा व्हिडीओ कधी चित्रित करण्यात आला हे अद्याप अस्पष्ट आहे.

दरम्यान, अमेरिकेने सीरियातल्या स्फोटात अल-बगदादीचा खात्मा झाल्याचा दावा केला होता. परंतु, या व्हिडीओमुळे नव्या चर्चांना उधाण आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.