पुणे -यंदाच्या वर्षी करोना साथीचे सावट असूनही नोंदणीकृत सार्वजनिक मंडळांच्या संख्येमध्ये तब्बल तीनशे मंडळांची वाढ झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे करोनाची साथ ओसरल्याचा हा परिणाम असल्याचे मानले जात असले तरी आयुक्तालयात नव्याने लोणीकंद व लोणीकाळभोर पोलीस ठाण्यांचा नव्याने समावेश झाल्याचाही परिणाम असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
शहरात 3282 सार्वजनिक मंडळांनी स्थापना केली आहे. मागील वर्षी ही संख्या 2949 इतकी होती. मागील वर्षी शहरात कोविड संसर्गाच्या प्रसारामुळे अनेक गणपती मंडळांनी उत्सव केला नाही. मागील वर्षी शहरात कोविडशी संबंधित निर्बंध लादण्यात आले होते. यावर्षी नोंदणीकृत बहुसंख्य गणपती मंडळांनी उत्सव साजरा करण्याची परवानगी घेतली.
पोलीस उपायुक्त (विशेष शाखा) मितेश घट्टे म्हणाले, “या वर्षी, अधिक गणपती मंडळांनी पोलिसांकडे अर्ज दाखल करून शहर पोलिसांकडून त्यांच्या मांडव किंवा मंदिरांमध्ये गणपतीच्या मूर्ती बसवण्याची परवानगी मागितली. आम्ही त्यांना परवानगी दिली. या वर्षी 3282 मंडळांनी 10 दिवसांचा उत्सव सार्वजनिकरित्या साजरा करण्यासाठी शहर पोलिसांकडून परवानगी मिळवली.
मागील वर्षी ही संख्या 2949 मंडळे इतकी होती. मागील वर्षी उत्सव साजरा न करणाऱ्या अनेक मंडळांनी या वर्षी उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. घट्टे म्हणाले, “आम्ही मंडळांना राज्य सरकार आणि पुणे महानगरपालिकेच्या (पीएमसी) कोविड नियमांशी संबंधित सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यास सांगितले आहे. त्याचवेळी लोकांनी अनिवार्य निकषांचे पालन केले पाहिजे’.