मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या तिच्या एका फोटोमुळे चर्चेत आली आहे. अनुष्काचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर भलताच व्हायरल होत आहे. या फोटोंमधील तिचा अंदाज पाहता अनेक चाहते घायाळ झाले आहेत. सध्या अनुष्का चित्रपटांमध्ये दिसत नसली तरी ती सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे. मात्र, व्हायरल झालेल्या या फोटोमुळे अनुष्का चांगलीच भडकली असल्याचं पाहायला मिळाला आहे.
‘पुमा’ या आंतरराष्ट्रीय ब्रॅंडने अभिनेत्री अनुष्का शर्माचा एक फोटो त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया आकाउंटवर शेअर केला आहे. आणि याच कारणामुळे अभिनेत्रीने या कंपनीला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. नुकतंच पुमा कंपनीने त्यांच्या काही कपड्यांची जाहिरात करण्यासाठी अनुष्का शर्माचे त्यांच्या आऊटफिटमधले काही फोटो शेअर केले होते. हे फोटो पाहताच अनुष्काने त्यांची कानउघडणी केली आहे. ‘परवानगीशिवाय माझे फोटो वापरल्याने’ अनुष्का त्यांच्यावर चांगलीच भडकली आहे. इंस्टाग्रामवर यांदर्भातील एक पोस्ट अनुष्काने शेअर केली आहे.
आपल्या पोस्ट मध्ये अभिनेत्री म्हणाली, “हॅलो पुमा, मी तुमच्या ब्रॅंडची अम्बॅसडर नसल्याने माझे कोणतेही फोटो जाहिरातीसाठी पोस्ट करण्याआधी तुम्ही माझी परवानगी घ्यायला हवी, हे तुम्हाला ठाऊक असेलच. कृपया ती पोस्ट हटवा’. असं ती म्हणाली. सध्या अनुष्का आपला पती विराट कोहलीसोबत जास्तीत जास्त वेळ घालवत आहे. अनुष्काच्या चाहत्यांना तिच्या आगामी चित्रपटाची प्रतीक्षा आहे. लवकरच तिने यासंबंधी घोषणा करावी याचे ते वाट पाहत आहेत