पुणे – महाराष्ट्रीय मंडळाच्या शिक्षण विभाग संचालक नेहा दामले यांच्या “गोष्टीतून शिकूया’ या पुस्तकाचे प्रकाशन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते नुकतेच प्रकाशन झाले.
टिळकरोड येथील महाराष्ट्रीय मंडळात झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी सुप्रसिद्ध नाट्य अभिनेते श्रीरंग गोडबोले, एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले आणि महाराष्ट्रीय मंडळाचे सरचिटणीस धनंजय दामले हे उपस्थित होते.
नेहा दामले यांनी लिहिलेल्या या पुस्तकात लहान मुलांसाठी “भारतीय संस्कृतीतील मूल्य आणि संस्कार’ या विषयावर लिखाण केले आहे. मुलांना आवडतील अशा गोष्टी स्वरूपात याची मांडणी करण्यात आली आहे.
आपल्या मनोगतात शिक्षणक्षेत्रात अनेकवर्षे काम केल्याने विद्यार्थ्यांना, अगदी छोट्या-छोट्या बालकांना खूप जवळून बघण्याची संधी मला मिळाली. मुले कशी शिकतात ? कोकणकोणत्या गोष्टींचा त्यांचा मनावर परिणाम होतो? संस्कारातून त्यांचे व्यक्तिमत्त्व कसे घडले जाते? याचा कानमंत्र जणू या पुरस्कातून देण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्यांनी यावेळी पुस्तकाबद्दल सांगितले.