नवी दिल्ली – धावपटू पी.टी.उषा, महान संगीतकार इलायराजा यांच्यासह अन्य काही मान्यवरांची राज्यसभेच्या सदस्यत्वासाठी निवड करण्यात आली आहे. समाजसेवक आणि धरमशाला येथील मंदिराचे व्यवस्थापक वीरेंद्र हेगडे आणि विख्यात सिने लेखक व्ही. विजयेंद्र प्रसाद यांचीही राज्यसभेच्या सदस्यत्वासाठी निवड करण्यात आली आहे.
पी.टी.उषा या प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणास्थानी आहेत. त्यांचे क्रीडाक्षेत्रातील योगदान सर्वांनाच माहिती आहे. त्याचबरोबर गेल्या काही वर्षांपासून नवोदित धावपटूंना त्यांनी दिलेले मार्गदर्शनही तितकेच मोलाचे आहे. राज्यसभेच्या सदस्यत्वासाठी त्यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे.
संगीतकार इलायराजा यांच्याबद्दलही पंतप्रधानांनी गौरवपूर्ण संदेश दिला असून राज्यसभा सदस्यत्वासाठी निवड झाल्याबद्दल त्यांचेही अभिनंदन केले आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील 12 व्यक्तींची राष्ट्रपतींकडून राज्यसबेवर नियुक्ती केली जात असते.
தலைமுறைகளைக் கடந்து @ilaiyaraaja அவர்களின் அற்புத படைப்பாற்றல் மக்களை மகிழ்வித்து வருகிறது. அவரது இசைப் படைப்புகள் பல்வேறு உணர்வுகளை அழகாக வெளிப்படுத்துவன. pic.twitter.com/qgV1ZlK9lP
— Narendra Modi (@narendramodi) July 6, 2022