पुणे – नागपूर भूखंड घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करत पुण्यातील शिवसैनिकांनी टिळक चौकात आंदोलन केले. आंदोलनात राजीनामा द्या, राजीनामा द्या, अशी घोषणाबाजी केली. यावेळी पक्षाचे पुणे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, उपशहरप्रमुख बाळा ओसवाल, अशोक हरणावळ, शहर संघटिका कल्पना थोरवे, मकरंद पेठकर,
रुपेश पवार, चंदन साळुंके, राहुल जेकटे, मुकुंद चव्हाण, राजेंद्र शिंदे, हेमंत यादव, इम्रान खान, संजय खोंडके, सचिन साळुंके, करुणा घाडगे, गौरी चव्हाण, श्रुती नाझिरकर, नेहा कुलकर्णी, सरोज कार्वेकर, विजया मोहिते, सुनीता खंडाळकर, संगीता भिलारे, विजया मोहिते आदी शिवसैनिक उपस्थित होते.