बेंगळुरू – प्रो-कबड्डी लीग स्पर्धेत सोमवारी झालेल्या सामन्यात हरियाणा स्टीलर्सने आगेकूच केली. त्यांनी येथे झालेल्या साखळी लढतीत गुरजात जायंट्स संघाचा 38-36 असा निसटता पराभव केला.
या सामन्यात हरियाणाच्या विकास कंडोला व मितू यांनी गुजरातवर सातत्याने दडपण राखले. या सामन्यात अखेरच्या काही मिनिटांत हरियाणाने रेट व रॅपिड गुणांच्या कमाईवर हा सामना जिंकला.
गुजरातने अखेरच्या काही मिनिटांत सलग 13 गुण मिळवताना सामन्यात रंगत निर्माण केली होती. मात्र, त्यांचा अनुभव काहीसा कमी पडला. गुजरातचा स्टार खेळाडू राकेश नरवालने संघाच्या विजयासाठी अथक प्रयत्न केले मात्र, हरियाणा संघाने अत्यंत मोक्याच्या क्षणी खेळ उंचावला व या सामन्यातील विजयासह स्पर्धेत आगेकूच केली.
गुजरात जायंट्सने 13 तर हरियाणा स्टीलर्सचे 12 गुण असून पुढील सर्व सामने जिंकले तर त्यांना बाद फेरी गाठण्याची संधी निश्चितच मिळणार आहे.