नवी दिल्ली – उत्तर प्रदेशमधील जालोनमध्ये आज सकाळी महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. त्यावर कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट करून या घटनेचा निषेध केला आहे.
कुछ दिनों पहले उप्र में बाबासाहेब अम्बेडकर जी की मूर्ति को असामाजिक तत्वों ने तोड़ा। अब जालौन में महात्मा गांधीजी की मूर्ति को तोड़ा गया।
मूर्ति तोड़ने वाले कायरों, जीवन में यही तुम्हारी उपलब्धि है कि रात के अंधेरे में छिपकर तुम देश के महापुरुषों..
1/2https://t.co/MrEuvgW7TL— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) September 14, 2019
त्या ट्विटमध्ये म्हणतात की “काही दिवसांपूर्वी काही समाजकंटकांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना केली होती. त्यानंतर आता महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. रात्रीच्या अंधारात लपून महापुरूषांचा अपमान करण्याचा तुम्ही प्रयत्न केला आहे. अशा प्रकारे त्यांच्या पुतळ्यांची विटंबना करून त्यांच्या महानतेचा एक अंशही तुम्ही कमी करू शकत नाही” अशा शब्दांत त्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.
उत्तर प्रदेशातील जालोनमधील गांधी इंटर महाविद्यालयात गांधींचा पुतळा आहे. आज सकाळी काही समाजकंटकांनी या पुतळ्याची विटंबना केली.