बॉलीवूडमधील देशी गर्ल प्रियांका चोप्राचा भाउ सिद्धार्थ चोप्रा याचा 27 फेब्रवारीला झालेल्या रोका सेरिमनीनंतर त्याची होणारी पत्नी इशिता कुमारचे जल्लोषी स्वागत करण्यात आले होते. पण त्यानंतर सिद्धार्थ आणि इशिताच्या नात्यात दुरावा निमार्ण झाला असल्याचे दिसते.
रोका सेरिमनीनंतर सर्वप्रथम इशिताने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून लग्नासंबंधीचे सर्व फोटो डिलीट केले. या डिलीट केलेल्या फोटोंमध्ये रोका सेरिमनीचेही फोटो होते. तसेच प्रियांका आणि सिद्धार्थनेही इंस्टाग्रावर इशिताला अनफॉलो केले.
दरम्यान, सिद्धार्थ अिाण इशिताचे एप्रिल महिन्यात लग्न पार पडणार होते. पण इशितावर एक इमर्जेंसी सर्जरी करण्यात आल्याने हा कार्यक्रम काही काळासाठी पुढे ढकलण्यात आला. या सर्जरीवेळी इशिताने हॉस्पिटलमधून काही फोटोज् शेअर करत लिहिले होते, “मी सर्जरीतून बरी होत आहे. मला खूप त्रास झाला, पण आता बरी होत असल्याचा आनंद आहे.’ त्यावर तिच्या आई-वडिलांनी कॉमेंट करत आम्ही तुझ्यासोबत असल्याचे म्हटले होते.
याच काळात इशिताने अचानक आपले इंस्टाग्राम अकाउंट डिलीट केले. तसेच सिद्धार्थ सोबत असलेले सर्व फोटोही डिलीट केले. त्यामुळे आता पुढील काळातच या दोघांचे लग्न पार पडणार की नाही, ते समजेल.