जोतिरादित्यना थांबविण्यासाठी मध्यप्रदेशात प्रियंका कार्ड

भोपाळ : मध्यप्रदेशातून प्रियंका गांधींना राजसभेवर पाठवण्याच्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत. ज्योतिरादित्य सिंधिया यांना थांबविण्यासाठी प्रियांका गांधी यांना राज्य सभेवर पाठवले जाऊ शकते. मुख्यमंत्री कमलनाथ आणि माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यातल्या राजकीय पेचामुळे प्रियंका गांधींचे नाव समोर केले जात आहे.

विशेष म्हणजे राज्यसभेच्या तीन जागा यावर्षी रिक्त होणार आहेत. यातील दोन कॉंग्रेसकडे तर, एक भाजपकडे आहे. कॉंग्रेसच्या दोन जागा यापूर्वी ज्योतिरादित्य सिंधिया आणि दिग्विजय सिंह यांनी लढवल्या आहेत. परंतु आता प्रियांका गांधी यांच्या नावाचीही चर्चा काँग्रेसकडून केली जात आहे.

अशा परिस्थितीत या तिन्ही दिग्गज नेत्यांपैकी एकाला हि संधी सोडावी लागणार आहे. या जागांवर सध्या दिग्विजय सिंह, प्रभात झा आणि सत्यनारायण जठिया हे सदस्य आहेत.

यावर्षी 2020 च्या अखेरीस राज्यसभेच्या 68 जागा देशभरातून रिक्त होणार आहेत. या निवडणुकीत काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर, प्रियांका गांधी-वड्रा, ज्योतिरादित्य सिंधिया, दिग्विजय सिंह यासारख्या अनेक दिग्गजांना मध्यप्रदेशातून राज्यसभेत पाठविण्याचा विचार काँग्रेस करीत आहे. या संदर्भात मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या दिल्ली दौऱ्यात चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.

 

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.