Priya Bapat – देशभरात दिवाळीनिमित्त खरेदी सुरु आहे. तसेच प्रत्येकाच्या घरात साफसफाई, रोषणाई, फराळ करण्यास सुरूवात झालीये. दिवाळीत प्रत्येकजन पणत्यांची आरास आणि आकाश कंदील यांचं विशेष आकर्षण असतं. अशात बाजारात वेगवेगळे आकाश कंदी दिसून येत आहे, याच आकाश कंदिलांसंदर्भात प्रिया बापटने शेअर केलेली पोस्ट सध्या चर्चेत आली आहे.
प्रिया बापट पोस्टमध्ये लिहिले आहे की,’प्लास्टिकचे कंदील बघून वीट आला आहे. आपले पारंपरिक कागदाचे कंदील सहजासहजी मिळतच नाहीत. मोजक्या काही टिकाणी मिळतात. पुढे तिने तिच्या चाहत्यांना प्रश्न विचारला आहे तुम्हाला कुठला कंदील आवडतो… कागदी कंदील की प्लस्टिक कंदील… ‘ प्रियाने खंत व्यक्त करणारी पोस्ट शेअर केली आहे.
प्रिया दिवाळी हा सण घरगुती फराळ व सजावट करत कुटुंबियांसमवेत दिवाळी साजरी करते. परंतु, यंदा प्रियाने शेअर केलेल्या एका पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. दरम्यान, अभिनेत्री प्रिया बापट यांची मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी आहे. दोघांनीही आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. मात्र बराच काळ या दोघांनी एकत्र काम केलेले नव्हते.
प्रियाच्या वर्क फ्रंटबाबत सांगायचं झाल्यास, तिने अनेक मराठीसह बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे.काही महिन्यांपूर्वी ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या सीरिजमुळे प्रिया देशभरात लोकप्रिय झाली. यामध्ये तिने पूर्णिमा गायकवाड हे पात्र साकारलं आहे. तसेच सध्या प्रिया ‘जर तरची गोष्ट’ या नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.