पृथ्वी शॉ डोपिंग प्रकरणी निलंबीत

मुंबई – भारतीय कसोटी संघाचा सलामीवीर पृथ्वी शॉ ला बीसीसीआयने उत्तेजक द्रव्य सेवन केल्या प्रकरणी आठ महिण्यांसाठी निलंबीत केले आहे.

बीसीसीआयने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद केले आहे की, पृथ्वी शॉने अनावधानाने हे उत्तेजक द्रव्य सेवन केले असून हे द्रव्य साधारणपणे खोकल्याच्या औषधात सामाविष्ट असते. पृथ्वी शॉ हा 16 मार्च 2019 पासून 15 नोव्हेंबर 2019 पर्यंत कोणत्याही प्रकारचे क्रिकेट खेळू शकणार नाही.

बीसीसीआयने या पत्रकात म्हंटले आहे की, ‘सय्यद मुश्‍ताक अली टूर्नामेंटच्या वेळी घेण्यात आलेल्या चाचणीमध्ये त्याने हे द्रव्य सेवन केलेले आढळले आहे. तर, पृथी शॉ सहीत अक्षय दुल्लारवर आणि दिव्य गजराज या दोन खेळाडूंवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ज्यातील अक्षय हा विदर्भाच्या संघाकडून खेळतो तर दिव्य हा राजस्थानचा खेळाडू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)