नारायणगाव- साळवाडी हद्दीत कुकडी नदीचे पात्रामध्ये असलेल्या झुडुपांमध्ये गावठी हातभट्टीची दारू तयार करताना नारायणगाव पोलिसांनी छापा टाकून 80 हजार 600 रुपयांची गावठी दारू, कच्चे रसायन व एक दुचाकी, असे 1 लाख 20 चा मुद्देमाल जप्त केला आहे. नारायणगाव पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल शैलेश अरूण वाघमारे यांनी दिली आहे.
पोलिसांना खबऱ्याकडून माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक घोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बी. वाय. लोंढे, आर. व्हि. शिंदे, एस. एस. दुपारगुडे, एस. एस. जायभाये यांच्या पथकाने छापा टाकला असता त्याठिकाणी हातभट्टीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यावेळी एकाने पोलिसांची चाहूल लागताच झुडुपांमधून पळून गेला.