अहमदनगर : लॉकडाऊनच्या काळात अवैध मद्य विक्रीचा सुळसुळाट झाला आहे. अहमदनगर जिल्ह्यात अवैध दारू विक्री करणाऱ्या तिघांच्या मुसक्या तोफखाना पोलिसांनी आवळल्या आहेत. अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयांच्या परिसरात अँब्युलन्समध्ये अवैध दारू विक्री करण्यात येत होती.
पोलिसांनी सापळा रचून आरोपीकडून 2 लाख 70 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शहराच्या मध्यभागी अवैध दारू विक्री होत असल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. शहरात लोकडाऊनचा फायदा घेत काही जण शहरात अवैध दारू विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली हाती. त्यानुसार तोफखाना पोलिसांनी शासकीय रुग्णालय परिसरात सापळा रचून तिघांना अटक केली आहे. पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात मास्टर ब्लेड कंपनीच्या विदेशी मद्याच्या बाटल्या पोलिसांना सापडल्या आहेत. तसेच बंदी असताना देखील छुप्या पद्धतीने किराणा दुकानांमधून तंबाखूजन्य पदार्थाची विक्री चढ्या दराने करण्यात येत आहे.
दरम्यान, लॉकडाउनच्या काळात अहमदनगर जिल्ह्यात 154 गुन्हे दाखल करण्यात आले आहे, तर 52 लाखांच्या मुद्देमालासह 59 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर 59 आरोपींना पोलिसांनीबेड्या ठोकल्या आहेत. तसेच 9 दारू दुकानांचे परवाने देखील रद्द करण्यात आले आहे.