कोपेनहेगन, (स्वीडन) – स्वीडनमध्ये झालेल्या निवडणुकीत उजव्या विचारसरणीच्या गटाला अल्पशा बहुमताने विजय मिळाल्याने सोशल डेमोक्रॅटिक पक्षाच्या पंतप्रधान माग्दालेना अँडरसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. संसदेच्या सभापतींना भेटून अँडरसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. नवीन सरकार स्थापन होईपर्यंत त्या काळजीवाहू पंतप्रधान म्हणून कार्यरत राहणार आहेत.
निवडणुकीत विजयी झालेल्या उजव्या गटामध्ये राष्ट्रवादी, स्थलांतरविरोधी विचार असलेल्या गटाचा समावेश आहे. या गटाचे नेत उल्फ क्रिस्तरसन यांना सरकार स्थापन करण्यासाठी पाचारण केले जाण्याची शक्यता आहे.
रविवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत 349 सदस्यांच्या संसदेमध्ये उजव्या गटाच्या मॉडरेट पक्षाला 176 जागा मिळाल्या. तर मध्य- डाव्या सोशल डेमोक्रॅट पक्षाला 173 जागा मिळाल्या आहेत. बुधवारी रात्रीपर्यंत 99.9 टक्के मतांची मोजणी झाली होती. तेंव्हाच अँडरसन यांनी आपल्या पक्षाचा पराभव स्विकारला होता.