नवी दिल्ली – आपण अनेकदा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सेल्फी घेताना पाहतो. सेल्फी घेताना किंवा प्रसंगी इतर पंतप्रधान मोदींच्या हातात आयफोन दिसला आहे. पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे या सर्व प्रसंगी आयफोनचे वेगवेगळे मॉडेल्स पंतप्रधान मोदींच्या हातात दिसले आहेत.
पंतप्रधान विशेष डिझाइन केलेले RAX (रिस्ट्रॅक्टेड एरिया एक्सचेंज) फोन किंवा सॅटेलाईट फोन वापरतात. या फोनमध्ये काही खास सॉफ्टवेअर आहेत. हा फोन हॅक आणि ट्रक करता येत नाही. हा फोन मिलिटरी फ्रिक्वेन्सी बॅंडवर कार्यरत राहतो. तसेच, NTRO आणि DEITY सारख्या संस्था त्यांचे नियमित निरीक्षण करतात.
पंतप्रधान आपल्या कार्यलयात सॅटेलाईट नंबर वापरतात. यात एन्क्रिप्टेड सुरक्षेचे तीन स्तर असतात. हा फोन सर्वात सुरक्षित मानला जातो. तसेच पंतप्रधानांच्या मुख्य सचिवांचा फोनही खास डिसाइन केलेला आहे. हे नवरत्न डिफेन्स PSU (पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग) भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) द्वारे तयार केले जाते. हा एक एन्क्रिप्टेड मोबाइल फोन आहे.