अहमदाबाद – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोठे बंधू सोमभाई मोदी यांनी गुरुवारी सांगितले की, त्यांची आई हिराबेन यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत असून त्यांनी सकाळी द्रव पदार्थ घेतले होते. 99 वर्षीय हीराबेन यांना बुधवारी सकाळी प्रकृती अस्वास्थ्यामुळे अहमदाबादमधील सुपर स्पेशालिटी यूएन मेहता इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओलॉजी अँड रिसर्च सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.
सोमभाई मोदी म्हणाले, त्यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे. आज प्रकृती बरी आहे, त्यांच्या हातापायांची हालचाल सुरु आहे. आई हिराबेन यांनी आम्हाला बसायला सांगितले आणि हॉस्पिटलने दिलेले द्रव पदार्थही घेतले. सीटी स्कॅन आणि एमआरआय केल्यानंतर डॉक्टर आज डिस्चार्जबाबत निर्णय घेतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. हीराबेन यांच्या प्रकृतीबाबत ताजी माहिती देताना गुजरात सरकारने सांगितले की, पंतप्रधान मोदींच्या आईंची प्रकृती आता बरी होत आहे. त्यांना एक-दोन दिवसांत रुग्णालयातून डिस्चार्ज मिळू शकतो. त्यांना विशेष वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. गुजरात सरकारने जारी केलेल्या संदेशात हीराबेन यांची प्रकृती आता पूर्वीपेक्षा बरी असल्याचे म्हटले आहे. त्यांना खाण्यासाठी द्रव पदार्थ दिले जात आहेत.
उच्च रक्तदाबामुळे हीराबेन यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. श्वास घेण्याच्या त्रासासोबतच त्यांना अशक्तपणाचाही त्रास होता. त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांचे पथक चोवीस तास लक्ष ठेवून आहे. प्राथमिक तपासणीत डॉक्टरांना हीराबेनमध्ये वयाशी संबंधित समस्या आढळून आली. रुग्णालयातील डॉक्टरांनी हीराबेनचे सर्व रिपोर्ट नॉर्मल असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, बुधवारी पीएम मोदी दुपारी दिल्लीहून अहमदाबादला रुग्णालयात पोहोचले होते. तासाभराहून अधिक काळ ते रुग्णालयातच होते.