नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचे निधन झाले आहे. वयाच्या 100 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून हिराबेन यांच्यावर यूएन मेहता रुग्णालयात उपचार सुरु होते. आज पहाटे साडेतीन वाजता उपचारादरम्यान हिराबेन मोदी यांचे निधन झाले. दरम्यान, मोदी कुटुंबियांकडून एक शोकसंदेश जारी करण्यात आला आहे.
आई हिराबेन यांच्या निधनावर पंतप्रधान मोदींच्या कुटुंबीयांनी एक संदेश जारी केला आहे. ज्यामध्ये त्यांनी म्हटले की, “या कठीण काळात त्यांच्यासाठी केलेल्या प्रार्थनांसाठी आम्ही सर्वांचे आभार मानतो. सर्वांनी दिवंगत आत्म्याला आपल्या चिंतनात ठेऊन आपले पूर्वनियोजित कार्यक्रम व वचनबद्धतेने पुढे चालू ठेवावे ही नम्र विनंती. हीच हिराबाला खरी श्रद्धांजली ठरेल.”
शानदार शताब्दी का ईश्वर चरणों में विराम… मां में मैंने हमेशा उस त्रिमूर्ति की अनुभूति की है, जिसमें एक तपस्वी की यात्रा, निष्काम कर्मयोगी का प्रतीक और मूल्यों के प्रति प्रतिबद्ध जीवन समाहित रहा है। pic.twitter.com/yE5xwRogJi
— Narendra Modi (@narendramodi) December 30, 2022
मागील दोन दिवसांपासून अहमदाबादमधील रुग्णालयामध्ये हिराबेन यांच्यावर उपचार सुरु होते. जून महिन्यामध्ये वयाची शंभरी ओलांडलेल्या हिराबेन यांना अस्वस्थ वाटू लागल्याने २८ डिसेंबर रोजी यूएन मेहता रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. पंतप्रधान मोदी त्याच दिवशी आईला भेटण्यासाठी अहमदाबाद गेले होते. आज रात्री साडेतीनच्या सुमारास हिराबेन मोदी यांनी अखेरचा श्वास घेतला.