#WomensT20WorldCup | पहिल्याच सामन्यात पाकिस्तानशी भिडणार; भारतीय संघाची घोषणा

Womens T20 WorldCup – २०२३ हे नवीन वर्ष क्रिकेट चाहत्यांसाठी मोठया उत्साहाचे असणार आहे. कारण पुढील वर्षात महिला क्रिकेटसह पुरुष क्रिकेटमधील आयसीसीच्या मोठया स्पर्धांचे अआयोजन केले जाणार आहे. त्याचबरोबर फेब्रुवारी महिन्यात महिला क्रिकेटचा टी-२० विश्वचषक खेळवला जाणार आहे. या स्पर्धेसाठी एकूण दहा संघ सहभागी होणार असून त्यासाठी संघाची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. विश्वचषक स्पर्धेसाठी बीसीसीआयने भारतीय महिला संघाची घोषणा केली आहे. हरमनप्रीत कौरकडे कार्णधारपद देण्यात आलय, तर स्मृती मंधाना उपकर्णधारपद सांभाळेल.
भारताला परदेशी प्रशिक्षक मिळणार? BCCIने दिलेत संकेत, मंग राहुल द्रविड यांचं काय होणार?
भारतीय संघाला ब गटात ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर इंग्लंड, पाकिस्तान, आयर्लंड आणि वेस्ट इंडिज संघांचा यामध्ये समावेश आहे. त्याचबरोबर अ गटात ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका या संघांचा समावेश आहे. भारतीय संघाला स्पर्धेतील पहिलाच सामना पाकिस्ताशी खेळायचा आहे. त्यामुळे चाहत्यांना या सामन्याची मोठी उत्सुकता लागलेली आहे. विश्वचषकाला १० फेब्रुवारीपासून यजमान दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यातून सुरुवात होणार आहे.
सूर्यकुमार यादवला ICC टी-20 क्रिकेटर ऑफ द इयर 2022 पुरस्कारासाठी नामांकन
भारतीय महिला संघाला या विश्वचषकापूर्वी जानेवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेत तीन देशांच्या टी-२० मालिकेत भाग घ्यायचा आहे. यासाठीही बीसीसीआयने १८ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. यामध्ये वेगवान गोलंदाज पूजा वस्त्राकर फिटनेस चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतरच संघात सामील होऊ शकेल. पूजा शेवटीही अनफिट राहिल्यास तिच्या जागी मेघना सिंग हिला संधी दिली जाऊ शकते. टी-२० विश्वचषकात १२ फेब्रुवारीला भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना खेळला जाणार आहे.
महिला टी-२० विश्वचषक २०२३ साठी भारतीय संघ: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), ऋचा घोष (यष्टीरक्षक), जेमिमाह रॉड्रिग्स, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, राधा यादव, रेणुका ठाकूर, अंजली शरवन, पूजा वस्त्रकार, राजेश्वरी गायकवाड, शिखा पांडे.





