नवी दिल्ली – ईद उल फित्र अर्थात आज (दि. 25) रमजान ईद. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा सोशल मीडियावरून सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Eid Mubarak!
Greetings on Eid-ul-Fitr. May this special occasion further the spirit of compassion, brotherhood and harmony. May everyone be healthy and prosperous.
— Narendra Modi (@narendramodi) May 25, 2020
मोदी म्हणाले, “रमजान ईदनिमित्त मी सर्व मुस्लिम बांधनांना शुभेच्छा देतो… ईदच्या निमित्ताने करुणा, बंधुता आणि सौहार्दाची भावना आणखी वाढावी… प्रत्येकजण निरोगी रहावं आणि सगळ्यांचीच भरभराट व्हावी”.
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेतात संपूर्ण भारतात मागील दोन महिन्यांपासून लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिक आपल्या घरी बसून आहे. या दरम्यान आलेल्या पवित्र रमजान महिन्याच्या काळात मुस्लिम बांधवांनी संयम पाळून आपले सर्व धार्मिक विधी घरीच पार पाडले.