नवी दिल्ली – करोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात थैमान घातला आहे. या लाटेचे चटके लहान मुलांपासून ते अबालवृद्धांपर्यंत सर्वानाच बसले आहेत. या लाटेत देशात जगातील विक्रमी रुग्णसंख्येची नोंद झाली.
देशात गेल्या महिनाभरापासून दररोज चार हजारांच्या आसपास करोना रुग्णांचे मृत्यू होत आहेत. गेल्या २४ तासांतील मृत्यूची आकडेवारीही भयावह असून, देशात एका दिवसातील आतापर्यंतची उच्चांकी नोंद झाली आहे. वाढत्या आकडेवारीमुळे देशातील वैद्यकीय विभागावर ताण आला आहे. तर
देशात कोरोना लसी, ऑक्सिजन सप्लाय, रेमडेसिवीरच्या इन्जेक्शनचा तुटवडा जाणवत होता. या काळात, खासकरुन उत्तर भारतात ऑक्सिजनच्या अभावी अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागला होता. यामुळे जनतेतून सरकारवर विरोधात संताप व्यक्त केला जात असून या करोना लाटेचा पंतप्रधान मोदींच्या प्रतिमेलाही मोठा धक्का बसला आहे.
मिळलेल्या माहितीनुसार, कोव्हिडच्या काळात मोदींची लोकप्रियता ढासळली आणि 63 टक्क्यांवर आली असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे इतर देशात ‘शक्तीशाली नेता’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्यांच्या या प्रतिमेला धक्का बसला आहे. अमेरिकन कंपनी असलेल्या मॉर्निंग कन्सल्टने जगभरातील काही नेत्यांच्या कोरोना काळातील लोकप्रियतेचा अभ्यास केला आहे. त्यामध्ये ही गोष्ट स्पष्ट झाल्याचं सांगितलं आहे.
मॉर्निंग कन्सल्टच्या मते, एप्रिलमध्ये देशात कोरोनाने चांगलाच थैमान घातला होता. या दरम्यान देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत आणि मृत्यूंच्या संख्येत दुपट्टीने वाढ होत होती. देशात कोरोना लसी, ऑक्सिजन सप्लाय, रेमडेसिवीरच्या इन्जेक्शनचा तुटवडा जाणवत होता. या काळात, खासकरुन उत्तर भारतात ऑक्सिजनच्या अभावी अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागला होता. यामुळे एप्रिल महिन्यात मोदींच्या लोकप्रियतेमध्ये 22 टक्क्यांची घट झाली होती असं मॉर्निंग कन्सल्टने आपल्या अभ्यासात म्हटलं आहे. नरेंद्र मोदींची लोकप्रियता आतापर्यंत सर्वाधिक कमी स्तरावर आली आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेची देशात तर घसरण झालीच आहे. मात्र, परदेशातही त्यांची प्रतिमा ढासळत असल्याचं स्पष्ट झालं आहे. मोदींच्या प्रतिमेला सगळ्यात जास्त धक्का नेपाळमध्ये बसला आहे. नेपाळमध्ये कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असून त्याला भारतच जबाबदार असल्याचं तिथल्या बऱ्याच नागरीकांचा आरोप आहे.