‘भारताचा अभिमान..’, मिल्खा सिंग यांना बॉलिवूडकरांनी वाहिली श्रद्धांजली

मुंबई – भारताचे महान धावपटू ‘मिल्खा सिंग’ यांचे शुक्रवारी रात्री करोनामुळे निधन झाले. वयाच्या 91 व्या वर्षी या महान खेळाडूने मृत्यूशी निकाराने झुंज दिली, मात्र ही झुंज अखेर अपयशी ठरली. मिल्खा सिंग यांच्या पत्नी व भारताच्या व्हॉलिबॉल संघाच्या माजी कर्णधार निर्मल कौर यांनी करोना संक्रमणामुळे पाच दिवसांपूर्वी अखेरचा श्वास घेतला होता.

दरम्यान, 2013 मध्ये मिल्खा सिंग यांच्या आयुष्यावर “भाग मिल्खा भाग..’ हा चित्रपट बनवण्यात आला होता. या चित्रपटात मिल्खा सिंग यांच्या भूमिकेत अभिनेता फरहान अख्तर दिसला होता. त्याने सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Farhan Akhtar (@faroutakhtar)

त्याने मिल्खा सिंग यांच्यासोबतचा फोटो पोस्ट करत त्यासोबत लिहिले आहे की, तुम्ही आज आमच्यात नाहीत यावर मला विश्वासच बसत नाहीये. तुमच्याकडून मी एक गोष्ट शिकलो आहे “की, कोणतीही परिस्थिती आली तरी हार पत्करायची नाही’. असं फरहान म्हणाला आहे.

तसेच, बॉलिवूड मधील अनेक दिग्ज कलाकारांनी ‘मिल्खा सिंग’ यांना श्रद्धांजली वाहिली आहे. प्रियंका चोप्रा, शाहरुख खान, अक्षय कुमार, अनुपम खेर, सुनील शेट्टी, अक्षय कुमार, अमिताभ बच्चन अनेकांनी मिल्खा सिंग यांच्या जाण्यावर दुःख व्यक्त केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.