कराड – राज्यात विधानसभेची धामधूम सुरू झाली असून अचारसंहिता ही लागली आहे. त्यामुळे कराड ग्रामीण पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांसह अवैध व्यावसायिकांवर कारवाईचा धडाका सुरू केला आहे. पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या सुचनेनंतर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने दोन दिवसात 57 संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.
या निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस प्रशासन अलर्ट झाले आहे. पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांसह अवैध व्यावसायिकांवर कारवाईची मोहिम सुरू केली आहे. गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला कारवाईच्या सुचना दिल्या आहेत. गत दोन दिवसांपासून रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांना पोलीस ठाण्यात आणले जात आहे. दिवसभर स्थानबद्ध करून त्यांच्याकडे कसुन चौकशी केली जात आहे. गंभीर गुन्हे दाखल असलेल्या संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. दोन दिवसात 57 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.