कीव – युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की देश सोडून पळून गेल्याची मोठी बातमी समोर आली आहे. झेलेन्स्की पोलंडला पळून गेल्याचा दावा रशियन संसदेच्या स्पीकरने केला आहे. यानंतर आता कीववर मोठा हल्ला होणार नसल्याचे बोलले जात आहे.
RussiaUkraineWar : राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की पोलंडला पळाले? युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी दिले स्पष्टीकरण
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात राजधानी कीव अनेक दिवसांपासून संकटाचा सामना करत होती. अशा परिस्थितीत झेलेन्स्की देश सोडून गेल्यानंतर आता कीववर हल्ला होणार नाही, अशी अपेक्षा आहे. मात्र, यावेळी रशियन सैन्याने युक्रेनच्या राजधानीभोवती प्रचंड वेढा घातला आहे.
दरम्यान, आतापर्यंत झेलेन्स्की किंवा युक्रेन सरकारकडून या वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही. हे लक्षात घेण्यासारखे आहे की व्होलोडिमिर झेलेन्स्कीने अनेक वेळा सांगितले आहे की तो आपला देश सोडून पळून जाणार नाही.
9 दिवसांपासू सुरु आहे युद्ध
गेल्या 9 दिवसांपासून रशिया युक्रेनवर सातत्याने हल्ले करत आहे. युक्रेनचे सैन्य रशियाशी सतत्याने लढत आहे, परंतु रशियन सैन्याची संख्या खूप जास्त आहे. त्याचवेळी रशिया युक्रेनची राजधानी कीवसह सर्व शहरांवर क्षेपणास्त्र हल्ले करत आहे. त्यामुळे युक्रेनला सर्वाधिक फटका बसला आहे. बहुतेक रशियन क्षेपणास्त्र हल्ले लष्कराच्या तळांवर झाले आहेत, ज्यात हजारो युक्रेनियन सैनिक मारले गेले आहेत. त्याचबरोबर युक्रेनकडून असाही दावा करण्यात आला आहे की, गेल्या 9 दिवसांत रशियाचे 9 हजारांहून अधिक सैनिक मारले गेले आहेत.