सिडनी : क्रिकेट विश्वाला हादरा देणारी बातमी समोर आली असून ऑस्ट्रेलियाचा महान खेळाडू शेन वॉर्न याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. तो 52 वर्षांचा होता.
वॉर्नची महान गोलंदाजांमध्ये गणती होते. तो कसोटी क्रिकेटमधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज म्हणून निवृत्त झाला होता.
वॉर्नच्या मॅनेजमेंट कंपनीने शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात म्हटलं की, वॉर्नचे थायलंडमधील कोह सामुई येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. “शेन वॉर्न त्याच्या व्हिलामध्ये बेशुद्ध स्थितीत आढळून आला.