राष्ट्रपती चार दिवसांच्या काश्‍मीर दौऱ्यावर

श्रीनगर,  – राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे आजपासून चार दिवसांच्या जम्मू काश्‍मीर दौऱ्यावर आले असून त्यांचे त्यासाठी आज श्रीनगरात आगमन झाले आहे.

राज्यपाल मनोज सिन्हा यांनी त्यांचे स्वागत केले. या दौऱ्यात राष्ट्रपती लडाखमधील द्रासलाही भेट देणार आहेत. तेथे ते कारगिल शहीदांच्या स्मारकावर जाऊन शहीदांना अभिवादन करणार आहेत.

सोमवारी कारगिल विजय दिवसाचा 22 वा स्मरण दिन आहे. 2019 मध्ये राष्ट्रपतींचा याच कार्यक्रमासाठी द्रासचा दौरा ठरला होता, पण त्यावेळी खराब हवामानामुळे तो होऊ शकलेला नव्हता. त्यामुळे बदामीबाग येथील लष्कराच्या 15 कॉर्पसच्या मुख्यालयात राष्ट्रपतींनी कारगिल शहिदांना आदरांजली अर्पण केली होती.

श्रीनगरच्या दौऱ्यात त्यांचा मुक्‍काम राजभवनावर असणार आहे. त्यामुळे त्यांच्या वास्तव्याच्या काळात त्या भागातील वाहतूक अन्यत्र वळवण्यात आली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.