देशातील पेट्रोलियम शुद्धीकरण कंपन्या सज्ज 

नवी दिल्ली – इराणकडून विकत घेतल्या जाणाऱ्या कच्च्या तेलावरच्या खरेदीवरील सवलत काढून घेण्याची घोषणा अमेरिकेने केली आहे. या पार्श्वभूमीवर भारतात पेट्रोलियम उत्पादनांची कमतरता जाणवू नये यासाठी सरकारने पुरेशी काळजी घेतली आहे. मे 2019 पासून भारतातील तेलशुद्धीकरण प्रकल्पांना कच्च्या तेलाचा पुरेसा पुरवठा होण्याची तरतूद सरकारने केली आहे.

जगातील विविध देशांकडून भारतात तेल कंपन्यांना कच्च्या तेलाचा अतिरिक्त पुरवठा होईल. कोणत्याही समस्येचा सामना करण्यासाठी भारतीय तेल शुद्धीकरण कंपन्या पूर्णपणे सज्ज असून देशात पेट्रोल, डिझेल आणि इतर पेट्रोलियम उत्पादनांची मागणी पूर्ण केली जाईल, असे पेट्रोलियम मंत्रालयाने म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.