Indian student । परेदशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. कारण एका ३३ वर्षीय भारतीय विद्यार्थिनीला मागच्या आठवड्यात लंडनमध्ये ट्रकने चिरडल्याची घटना घडलीय. या घटनेत विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याचे समोर आलंय. चेइस्ता कोचर असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. चेइस्ता कोचर त्यांच्या पतीसह घरी परतत होत्या. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये त्या पीएचडी करत होत्या.
अशी घडली नेमकी घटना? Indian student ।
नीती आयोगाचे माजी सीईओ अमिताभ कांत यांनी चेइस्ता कोचर यांच्या अपघाती मृत्यूची माहिती दिली. चेइस्ता कोचर यांच्यासह मी Life नावाच्या कार्यक्रमात काम केलं आहे. लंडनमध्ये सायकल चालवत असताना ही भयंकर दुर्घटना घडली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. चेइस्ता कोचर प्रतिभाशाली आणि हुशार होत्या. १९ मार्चच्या दिवशी त्यांना एका ट्रकने धडक दिली त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे पती प्रशांत त्यावेळी त्यांच्यासह होते. ते चेइस्ता कोचर यांच्या मदतीसाठी धावले पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेमुळे आम्ही खूपच दुःखी – वडिल Indian student ।
जनरल एसपी कोचर (निवृत्त) हे चेइस्ता यांचा मृतदेह घेण्यासाठी लंडनला गेले आहेत. त्यांनी लिंक्डइनवर एक पोस्ट लिहिली आहे. “मी लंडनला माझ्या मुलीचं पार्थिव घेण्यासाठी लंडनला पोहचलो आहे. १९ मार्चला ती सायकल चालवत होती त्यावेळी एका ट्रकने तिला चिरडलं. या घटनेमुळे आम्ही खूपच दुःखी झालो आहोत.”असे म्हणत त्यांच्या वडिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
चेइस्ता कोचर लंडन स्कूल ऑफ अर्थशास्त्रात पीएचडी करत होत्या. मागच्या वर्षी त्या लंडनला गेल्या होत्या. त्याआधी त्यांनी दिल्ली विद्यापीठ, अशोक विद्यापीठ आणि शिकागो विद्यापीठातूनही पदवी घेतली आहे. त्यांनी नीत आयोगासह २०२१ ते २०२३ दरम्यान काम केलं होतं. त्यांच्या मृत्यूमुळे कोचर परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.