नवी दिल्ली -निवडणूक रणनीतीज्ज्ञ प्रशांत किशोर यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत पंजाबच्या आगामी विधानसभा निवडणुकांबाबत चर्चा झाल्याचा कयास आहे. मात्र, त्याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली नाही.
दरम्यान, यावेळी कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी, हरिश रावत आणि के. सी. वेणुगोपाल आदी नेतेही यावेळी उपस्थित होते. या भेटीवर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
माध्यमांशी बोलतांना ते म्हणाले,’प्रशांत किशोर जर रॉल गांधींना भेटत असेल तर तो त्यांच्या पक्षाचा वैयक्तिक विषय आहे. यापूर्वी ते शरद पवार यांना भेटले होते मात्र आता पर्यंत याबाबत कुठलीही माहिती समोर आलेली नाही मात्र या भेटींवर माध्यमांद्वारे तर्क वितर्क लावण्यात आले आहे. ते पुढे म्हणाले,’प्रशांत किशोर ही निवडणूकांमध्ये काम करतात. मात्र नक्की ते काय करतायत याच्याविषयी अधिकृतरित्या बाहेर आलेलं नाही.’