‘पिकासो’चा फर्स्ट लूक प्रदर्शित, कोकणातील दशावतारी कलावंताची कथा येणार समोर

मुंबई – ‘पिकासो’ या चित्रपटातून अभिनेता प्रसाद ओक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कोकणातील दशावतारी कलावंताची कथा या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता असलेल्या प्रसादचा या चित्रपटातील फर्स्ट लूकदेखील प्रदर्शित झाला आहे. प्रसादची दशावतारातील मोहक छबी पाहून प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. अभिनेता प्रसाद ओकने सोशल मीडियावर हे पोस्टर शेअर केले आहे.

 

View this post on Instagram

 

Very happy????? Presenting the first look… PICASSO #PicassoTheFilm #PicassoMarathi @platoononefilms @shiladityabora @abhijeetwarang

A post shared by Prasad Oak (@oakprasad) on

या चित्रपटाची कथा व दिग्दर्शन अभिजीत मोहन वारंग यांचं आहे. ‘बुटीक फिल्म स्टुडिओ’आणि ‘प्लॅटून वन फिल्म्स’यांच्या संयुक्त विद्यमाने या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. निर्माते शिलादित्य बोरा यांची ही पहिलीच निर्मिती आहे. ‘कोर्ट’ या बहुचर्चित तसेच लोकप्रिय चित्रपटाच्या वितरण व मार्केटिंगचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट जगभरातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या ‘१० व्या जागरण आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ आणि ‘७व्या ब्रह्मपुत्र व्हॅली फिल्म फेस्टिव्हल’ करिता निवडला गेला आहे.

तळ कोकणातील वालावल येथील लक्ष्मी – नारायण या पौराणिक मंदिरात दशावतार या लोककलेचा इतिहास व त्याविषयीचे दस्तऐवज उपलब्ध आहे. या लोककलेवर बेतलेला ‘पिकासो’ हा एकमेव चित्रपट आहे. याचे चित्रीकरणही याच मंदिरातच करण्यात आले आहे. या लोककलेला ८०० वर्षांचा प्रदीर्घ इतिहास आहे.

या दशावतारी कलेसाठी प्रचंड आर्थिक संघर्ष करून, आपले कर्तव्य समजून तिला जिवंत ठेवण्याचे कार्य करणाऱ्या अगणित दशावतारी हयात व दिवंगत कलावंत, गायक यांना हा चित्रपट आम्ही समर्पित करीत आहोत, असे या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक अभिजीत मोहन वारंग यांनी सांगितलं आहे.

अभिनेता प्रसाद ओकने दशावतारी रंजल्यागांजलेल्या व्यसनाधीन पित्याची विलक्षण भूमिका साकारली आहे. राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या ‘किल्ला’ चित्रपटाचे लेखक तुषार परांजपे हे ‘पिकासो’ साठी क्रिएटिव्ह दिग्दर्शक आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.