सोलापूर – राष्ट्रवादी काँग्रेस आमदार रोहित पवारांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा वारंवार पराभव होत आहे. त्यामुळे हा मतदारसंघ आता राष्ट्रवादीला सोडावा. राष्ट्रवादी हा मतदारसंघ लढवू शकतो, असं विधान केले होते. या विधानानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावरून काँग्रेस-राष्ट्रवादीतील स्थानिक नेत्यांसह राज्यातील नेत्यांमध्ये वाद पेटलेला दिसून येत आहे.
दरम्यान रोहित पवार यांच्या या विधानावर काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या,’कोण रोहित पवार? ही त्यांची पहिली टर्म आहे काही जणांमध्ये पोरकटपणा असतो.काही दिवस जाऊ द्या त्यांच्यामध्ये मॅच्युरिटी येईल”‘ असं म्हणत प्रणिती शिंदेंनी चांगलाच समाचार घेतला.
पहा व्हिडिओ
कोण रोहित पवार? प्रणिती शिंदेंनी कडक शब्दात सुनावलं#rohitpawar #MaharashtraPolitics pic.twitter.com/Oxh3MEPjNu
— Dhanshri Otari (@DhanshriOtari) February 10, 2023