मुंबई – अभिनेत्री आणि मॉडेल उर्फी जावेद सध्या ड्रेसिंग स्टाईल पेक्षा आपल्या वक्तव्यांमुळे आणि सोशल मीडियावरील पोस्टमुळे चांगलीच चर्चेत असते. भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याशी पंगा घेतल्यानंतर आता उर्फीने पुन्हा एकदा भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्र सरकारने ‘काऊ हग डे’बाबत आव्हान केल्यानंतर उर्फीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यावर तिने मजेशीर कॅप्शन देखील दिले आहे.
केंद्र सरकारने 14 फेब्रुवारी अर्थात ‘व्हॅलेंटाईन डे’ला काऊ हग डे साजरा करण्याचे आवाहन केले आहे. सरकारच्या या आव्हानाची खिल्ली उडवत उर्फीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एक नेता गाईला हात लावू पाहतोय मात्र गाय काही केल्या या नेत्याला जवळ येऊन देत नसल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येते. ‘नो मीन्स नो’ काऊ हग डे हा हॅशटॅग वापरात उर्फीने हा व्हिडीओ शेअर केला आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओवर ‘जेव्हा भाजप नेता काऊ हग डे साजरा करण्यासाठी जातो’ असे कॅप्शन लिहिलेले दिसत आहे.
उर्फीची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. उर्फीच्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. काहींनी तिला संस्कृतीबाबतचे धडे दिले आहेत तर काहींनी उर्फीच्या या डेअरिंगचे कौतुक देखील केले आहे.
#cowhugging 😂😂 https://t.co/nI7LhoeVkZ
— Uorfi (@uorfi_) February 9, 2023
येत्या 14 फेब्रुवारीला ‘काऊ हग डे’ साजरा करा असे फर्मान केंद्र सरकारच्या पशू कल्याण बोर्डाने काढले आहे. या दिवशी गायींना अलिंगन देऊन त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करा, असं आवाहन सरकारने केलं आहे.सरकाराच्या या आवाहनानंतर हा चर्चेचा विषय ठरू लागला आहे.